ग्रंथालयाच्या विषयी माहिती
‘प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ हे समर्थ रामदासांचे वचन ग्रंथालयाचे महत्व लक्षात आणून देते. महाविद्यालयाचे ग्रंथालय ग्रंथसंपदेने समृद्ध असून ते सर्व सोयींनी सुसज्ज आहे. विद्यार्थ्यांसाठी वाचन कक्षाची सोय केलेली असून यामध्ये दैनिक वृत्तपत्रे, साप्ताहिक, पाक्षिक, मासिके इ. उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ग्रंथालय सकाळपासून ते सायंकाळपर्यंत सुरू असते. याचा विद्यार्थ्यांनी विविध विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी तसेच आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढविण्यासाठी उपयोग करून घ्यावा.
ग्रंथालयाचे नियम –
१) प्रत्येक विद्यार्थ्यास ओळखपत्र दिले जाईल. ते त्याने महाविद्यालयात नेहमीच जवळ बाळगणे आवश्यक आहे.
२) ओळखपत्र दाखविल्याशिवाय विद्यार्थ्यांना ग्रंथालयातून पुस्तके मिळणार नाही. तसेच ओळखपत्राशिवाय वाचनालयात प्रवेश मिळणार नाही.
३) ग्रंथालय तसेच वाचन कक्षात शांतता राखली पाहिजे.
४) एका वेळेस फक्त एकच पुस्तक, एका आठवड्यासाठी दिले जाईल.
५) ग्रंथालयाच्या परवानगीने योग्य कारणासाठी पुस्तकांचे नूतनीकरण करता येईल.
६) दुसरे सत्र संपण्यापूर्वी पुस्तक परत करणे आवश्यक आहे.
७) ठरविलेल्या मुदतीनंतर पुस्तक परत करणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिदिन एक रुपया प्रमाणे दंड, पुस्तक जमा करेपर्यंत आकारला जाईल.
८) पुस्तक हरविल्यास पुस्तकाच्या किमतीच्या दीडपट रक्कम भरावी लागेल.
९) पुस्तकाचे पान फाटल्यावर, मजकूर लिहिल्यास किंवा पुस्तक खराब केल्यास दंड आकारला जाईल.
१०) वाचनकक्षातील नियतकालिकावर लिहिणे, पाने व चित्रे काढून घेणे दंडनीय आहे.
११) ग्रंथालयाचे बेबाकी प्रमाणपत्र आणल्याशिवाय परीक्षेचे हॉलतिकीट दिले जाणार नाही.
१२) मुला व मुलींसाठी स्वतंत्र वाचन कक्ष.

