शासकीय सवलती व शिष्यवृत्ती
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी ई.बी.सी. सवलत :
| ज्या विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २,५०,०००/- पेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून मिळणाऱ्या शुल्काव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे शुल्क दिल्यानंतर प्रवेश दिला जाईल. प्रवेश घेते वेळेसच अर्ज भरावा.
१. अर्जदाराच्या पालकाचे उत्पन्न रु. २,५०,०००/- पेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांनी नादारीच्या अर्जाच्या दोन प्रती सादर केल्या पाहिजे. २. आई-वडील किंवा पालक हयात नसतील तर विद्यार्थ्यांनी अर्जावर स्वाक्षरी करावी, असे करीत असताना विद्यार्थ्यांचे वय २१ पेक्षा कमी असू नये. ३. नादारी अर्ज सुबक अक्षरात व संपूर्ण भरलेला असावा. ४. १०,००० किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावी रहिवाशी असलेल्या विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे उत्पन्न रु. ८,००० च्या आत आहे. अशा विद्यार्थ्यांनी तहसीलदार अथवा उच्च अधिकारी व्यक्तीच्या सहीने उत्पन्नाचा दाखला सादर करावा तसेच १०,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीची मोहर (सील) असलेला उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल. ५. वर्गातील उपस्थिती ७५% असणे आवश्यक आहे. ही सवलत फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच लागू आहे. ६. नादारीचा अर्ज अपूर्ण भरलेला असल्यास, शेवटी निश्चित दिलेल्या मुदतीपर्यंत रद्द करण्यात येईल. ७. नादारीच्या अर्जासोबतच उत्पन्न दाखला दोन प्रती सादर करावा लागेल. ८. विद्यार्थी बाहेरच्या विद्यालयातून किंवा महाविद्यालयातून आला असेल तर ई.बी.सी. मंजुरी क्रमांक आणणे आवश्यक आहे. ९. आजी-माजी सैनिकांच्या मुलांना शिष्यवृत्ती. १०. राष्ट्रीय गुणवत्ता, कर्जाऊ व अहिंद – माफीकांना शिष्यवृत्ती. ११. अपंगांना अशासकीय शिष्यवृत्ती. १२. प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या मुलांना सवलती. १३. विद्यार्थी सहाय्य निधीतून नियमानुसार क्रमिक पुस्तके. १४. एकदाच अनुत्तीर्ण झालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत. १५. सरकारच्या नियमाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यास मूळ गावी जाण्यासाठी वर्षातून फक्त दोन वेळेस रेल्वे/बस सवलत मिळू शकेल. १६. विद्यार्थ्यांनी तासिकांना नियमित उपस्थित राहणे आवश्यक असून वार्षिक उपस्थिती किमान ८०% असणे आवश्यक आहे. |
भारत सरकार शिष्यवृत्ती (Govt. of India Scholarship) :–
वर्गीकृत जाती जमाती व नवबौद्ध आणि विशेष प्रवर्ग जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती दिल्या जाते. महाविद्यालयात अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना त्याला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. मात्र त्याने आपले सर्व शैक्षणिक दाखले योग्य निकषासह तसेच जातीचे प्रमाणपत्र सुचित वेळेच्या आत सादर केले पाहिजेत. प्रवेश डुप्लिकेट टी.सी. वर असल्यास शिष्यवृत्ती व ई.बी.सी. सवलत मिळणार नाही
शिष्यवृत्ती वाटपाचे नियम :-
| १. शिष्यवृत्ती रक्कम मंजूर झाल्याशिवाय संपूर्ण शिष्यवृत्ती मिळणार नाही. शिष्यवृत्ती Online बँक खात्यामध्ये जमा होईल.
२. शिष्यवृत्ती (फॉर्म) अर्जदाखल Online भरून अचूक माहितीसह अंतिम तारखेपूर्वी कार्यालयात सादर करावे. ३. शिष्यवृत्तीच्या फॉर्मसोबत तहसीलदारांनी दिलेले जातीचे व उत्पन्नाचे मूळ प्रमाणपत्र आणि मार्कमेमो जोडणे आवश्यक आहे. ४. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने बँकेत खाते उघडून क्रमांक दिल्याशिवाय शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. ५. कोणत्याही प्रमाणपत्रावर खाडाखोड केलेली आहे असा संशय असल्यास असे प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही. ६. शिष्यवृत्ती देताना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा विचार केला जाईल. ७५% उपस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. ७. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेत नापास होणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र असतील, परंतु संबंधित विद्यार्थ्यांना (फ्रिशीप) फी माफीचा लाभ दिला जाईल. ८. उत्पन्नाचा सर्व बाबींचा विचार करून पालकाचे मासिक उत्पन्न रु. २,५०,०००/- पेक्षा अधिक असल्यास अपात्र राहतील. भारत सरकार शिष्यवृत्ती अर्जाचे भरण्याची पद्धत :- १. एस.सी., एस.टी., एन.टी., ओ.बी.सी., एस.बी.सी., अपंग विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ठराविक नमुन्यात अर्ज जून महिन्यात प्रवेश घेते वेळीच उपलब्ध करून दिला जाईल. २. विद्यार्थ्यांनी योग्य खबरदारी घेऊन अर्ज काळजीपूर्वक भरला पाहिजे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ३. महाविद्यालयात प्रवेश घेताना प्रवेशाच्या सर्व अटींची पूर्तता केल्याशिवाय व भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज सादर केल्याशिवाय शिष्यवृत्तीची अग्रीम रक्कम मिळणार नाही. |
शिष्यवृत्ती फॉर्मसंगेत जोडावयाची कागदपत्रे – NEW SCHLORSHIP FORM
| १) शाळेचे ओळखपत्र I Card (एक झेरॉक्स प्रत)
२) १० वी बोर्ड सर्टिफिकेट झेरॉक्स आवश्यक (एक झेरॉक्स प्रत) ३) आधार कार्ड (एक झेरॉक्स प्रत) ४) बँक पासबुक (जे आधार लिंक आहे) (एक झेरॉक्स प्रत) ५) आधार लिंक पावती (बँकेचा सही व शिक्का) (ओरिजनल) ६) १०/१२ वी मार्क मेमो व टी.सी. झेरॉक्स (एक झेरॉक्स प्रत) ७) ज्या वर्गामध्ये प्रवेश घेतला आहे. त्या मागील तीन वर्षांच्या मार्क मेमोच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. (प्रत्येकी एक झेरॉक्स प्रत) उदा. बी.ए. ला प्रवेश घेतला असेल तर १० वी, ११ वी, १२ वी मार्क मेमोची झेरॉक्स प्रत. ८) तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (ओरिजनल) ९) जातीचा दाखला (झेरॉक्स प्रत) १०) इतर मागासवर्गीयांसाठी नॉन क्रिमिलेअर दाखला. ११) शिष्यवृत्ती आदेश क्रमांक. १२) यापूर्वी शिष्यवृत्ती घेतलेली नसल्यास मागील शाळेची शिष्यवृत्ती न घेतल्याबाबतचे पत्र व तसेच तहसील कार्यालयातून शिष्यवृत्ती न घेतल्याबाबतचे शपथपत्र (१०० रु. बॉण्डवर) १३) शिक्षणात खंड असेल तर शैक्षणिक खंड शपथपत्र (१०० रु. बॉण्डवर) १४) शिष्यवृत्ती मिळत असताना खंड पडला असेल तर शिष्यवृत्ती खंड प्रमाणपत्र. १५) दोन फोटो नोट : नवीन फॉर्म भरण्यासाठी (ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये प्रथम प्रवेश घेतला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत शिष्यवृत्ती फॉर्म भरलेला नाही.) |
जुन्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी – RENEWAL SCHOLARSHIP FORM
| १. शाळेचे ओळखपत्र.
२. मागील वर्षाची मार्क मेमोचे झेरॉक्स. ३. आधार कार्ड ४. आधार लिंक बँकेची पावती ५. बँक पासबुक झेरॉक्स प्रत. नोट : ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये शिष्यवृत्ती फॉर्म प्रथम वेळेस भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. टीप : विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर १५ दिवसांच्या आत शिष्यवृत्ती आवेदन पत्र सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी म. चांगली सूचना : १. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही. २. प्रथम सत्र पूर्ण न करता महाविद्यालय सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यास नियमानुसार फी भरावी लागेल. ३. कोणत्याही विद्यार्थ्याच्या नावावर असलेली बाकी रक्कम त्याने भरल्याखेरीज विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परीक्षेस बसता येणार नाही. ४. टी.सी.ची द्वितीय प्रत सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्ण शैक्षणिक शुल्क भरावे लागेल. ५. भारत सरकार शिष्यवृत्ती ज्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू आहे, अशा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आवेदन अर्ज न भरल्यास त्यांना शिक्षण शुल्क रु. १६००/- भरावे लागेल. ६. विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान मंडळ, इतर संस्था व महाराष्ट्र शासन यांच्याकडून फी माफी किंवा इतर बाबीं संबंधी असलेल्या सूचना तसेच परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, शिष्यवृत्ती बाबत व इतर सूचना, सूचना फलकावर लावल्या जातील. संबंधित विद्यार्थ्यांनी त्याची दखल घ्यावी. सूचना न बघण्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस महाविद्यालय जबाबदार राहणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ७. प्राध्यापकांच्या परवानगीशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यास वर्ग सोडून बाहेर जाता येणार नाही. तसेच आताही येता येणार नाही. |
